गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलिसांचा रूट मार्च; खाकीची शहरभर नजर

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260924-WA0648

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलिसांचा रूट मार्च; खाकीची शहरभर नजर

 

अमळनेर : विक्की जाधव.

गणेशोत्सव आणि अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अमळनेर पोलिसांनी बुधवारी शहरातील विविध संवेदनशील भागांत रूट मार्च काढला. सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० या वेळेत अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या उपस्थितीत हा रूट मार्च पार पडला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष चौक, मुख्य बाजारपेठ, तिरंगा चौक, पवन चौक, मंगलादेवी चौक, झामी चौक, आखाडा मकान, कसाली डी.पी., वाडी चौक, पानखिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, पाचकंदील चौक आणि गांधलीपुरा पोलीस चौकी परिसरातून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.या रूट मार्चमध्ये ९ पोलीस अधिकारी, ९५ पोलीस अंमलदार, १ आर.सी.पी., १ स्ट्रायकिंग फोर्स आणि ११८ होमगार्ड सहभागी झाले होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संवेदनशील भागांवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!