अमळनेरात गणेश विसर्जनासाठी प्रशासन अलर्ट; बॉम्ब शोधक पथकाची शहरभर तपासणी

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260920-WA1177

अमळनेरात गणेश विसर्जनासाठी प्रशासन अलर्ट; बॉम्ब शोधक पथकाची शहरभर तपासणी

 

अमळनेर : विक्की जाधव.

गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांमध्ये बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली. मिरवणुकीचे मार्ग, गर्दीची ठिकाणे तसेच विविध संवेदनशील परिसराची पथकाने पाहणी करून सुरक्षेची खातरजमा केली.

या बॉम्ब शोधक पथकात पोलीस हवालदार दीपक गजरे, पोलीस हवालदार रवींद्र मोतिराया, पोलीस हवालदार नरेंद्र ठाकूर, पोलीस हवालदार राहुल पाटील, पोलीस हवालदार रामदास साळुंखे आणि चालक वसीम शेख यांचा समावेश होता. यावेळी पथकासोबत प्रशिक्षित श्वान क्रिश देखील उपस्थित होता. क्रिशच्या मदतीने विविध ठिकाणी बारकाईने तपासणी करण्यात आली.

गणेशोत्सवाचा आनंद आणि विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनीही प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करून अफवांवर विश्वास न ठेवता कोणताही अनुचित प्रकार समोर आल्यास पोलिसांना संपर्क करावा. असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे गणेशभक्तांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!