भिगवणच्या चिमुकल्याची कुस्तीत बाजी; जिल्हा परिषद शाळेचा हुजेफ बक्षी तालुक्यात प्रथम
(निलेश गायकवाड)
भिगवण (प्रतिनिधी) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंदापूर तालुका शालेय कुस्ती स्पर्धा सन २०२६-२७ नुकत्याच उत्साहात पार पडल्या.
लोणी देवकर येथील आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती केंद्र येथे दि. १८, १९, २० सप्टेंबर दरम्यान या स्पर्धा झाल्या. १४, १७, १९ वर्षाखालील मुले-मुली असे वयोगट या स्पर्धेसाठी होते.
या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भिगवण चा विद्यार्थी कु. हुजेफ बक्षी याने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. ४१ किलो वजन गटात त्याने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
त्याच्या या यशाबद्दल तालुका क्रीडा अधिकारी श्री. महेश चावले, बापूसाहेब कुस्ती संकुल निमगाव केतकीचे अध्यक्ष अस्लम मुलाणी, क्रीडा शिक्षक मोरे सर, आमेल थोरवे व इतर मान्यवरांच्या हस्ते त्याचे कौतुक करण्यात आले व त्याला पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
हुजेफच्या या यशामुळे जि.प. शाळा भिगवण तसेच भिगवण परिसरातून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय इंदापूर चे श्री. अशोक करे (९७३०४३४४२५) व श्री. समाधान खांडेकर (७२७६८११०२३) यांनी केले होते.