सिना नदीत पाच जण बुडाले, दोघेजन बेपत्ता, तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले..

अपनी भाषा में पढ़े! Translate

Wh

सिना नदीत पाच जण बुडाले, दोघेजन बेपत्ता, तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले..
प्रतिनिधी अजिनाथ कनिचे

WhatsApp Image 2026-09-18 at 7.17.53 PM

माढा तालुक्यातील निमगाव येथे सीना नदी पात्रात पाच जण बुडाल्याने निमगाव येथील गावकऱ्यांनी तिघांना वाचवण्यात यश आले असून दोघेजण बेपत्ता झाले आहेत.
मंगेश अंधारे वय २५, प्रवीण गायकवाड वय २८, सोहम ओहोळ वय १५तिघेही रा भोंजे ता. बार्शी हे सुखरू आसून, प्रतीक भालेराव वय २३ व गणेश गायकवाड वय २४रा. भोंजे ता. बार्शी येथील असून, हे दोघेजण बेपत्ता झाले आहेत.
दुपारी १वाजन्याच्या सुमारास भोंजे येथून पोहण्यासाठी निमगाव येथील बंधाऱ्याच्या खाली आले असता. नदीच्या कडेवर तिघेजण पोहत असताना, पाय घसरून दोघेजण वाहत चालले असता. कपडे धुणाऱ्या एका महिलेचे लक्ष गेल्याने आरडाओरडा केल्यानंतर निमगाव येथील भास्कर सोपान थोरात व माऊली शिंदे यांनी या तिघांपैकी प्रवीण गायकवाड यास बाहेर काढण्यात यश आले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघांना बाहेर काढता आले नाही. पाण्यात बुडाल्यामुळे परत वर आलेच नाहीत. दोघांना शोधण्यासाठी उपाय योजना चालू आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!