भिगवणच्या पैलवानाची कुस्तीत चमक; ६२ किलो गटात आलोक काळंगे तालुक्यात प्रथम

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-09-19 at 11.17.46 AM

भिगवणच्या पैलवानाची कुस्तीत चमक; ६२ किलो गटात आलोक काळंगे तालुक्यात प्रथम

( निलेश गायकवाड)

भिगवण (प्रतिनिधी) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंदापूर तालुका शालेय कुस्ती स्पर्धा सन २०२६-२७ मध्ये भिगवणच्या पैलवानाने बाजी मारली आहे.

लोणी देवकर येथील आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती केंद्र, इंदापूर येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत १४ वर्षाखालील ६२ किलो वजन गटात भैरवनाथ विद्यालय, भिगवण चा विद्यार्थी कु. आलोक अनिल काळंगे याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

आलोक हा जय मल्हार तालीम, भिगवण येथे नियमित सराव करतो. त्याला प्रशिक्षक दत्ता गायकवाड, अजय कोथमीरे, नागेश गायकवाड व बनकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.

त्याच्या या घवघवीत यशाबद्दल भैरवनाथ विद्यालय व जय मल्हार तालीम परिवाराकडून त्याचे हार्दिक अभिनंदन होत असून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!