भिगवणचे बस स्थानक रखडले; नागरिकांचे हाल, प्रशासनाची हलगर्जीपणा चव्हाट्यावर

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-09-20 at 10.10.06 AM

भिगवणचे बस स्थानक रखडले; नागरिकांचे हाल, प्रशासनाची हलगर्जीपणा चव्हाट्यावर

(निलेश गायकवाड)

भिगवण (प्रतिनिधी) – इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या भिगवण येथील नव्याने होत असलेल्या बस स्थानकाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू असून, ते पूर्णपणे रखडले आहे. या रखडलेल्या कामामुळे प्रवासी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

प्रवाशांचे हाल
भिगवण हे पुणे-सोलापूर महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण आहे. दररोज हजारो प्रवासी येथून प्रवास करतात. मात्र बस स्थानकाचे काम अर्धवट असल्याने प्रवाशांना बससाठी उघड्यावर ताटकळत उभे राहावे लागत आहे. पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य, उन्हाळ्यात सावली नाही आणि महिलांना, वृद्धांना, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी कोणतीही सोय नाही. तात्पुरत्या स्वरूपात सुरू असलेल्या बस स्थानकात स्वच्छतागृहाची देखील गैरसोय आहे.

प्रशासन जबाबदार
कोट्यवधी रुपये खर्च करून मंजूर झालेल्या या बस स्थानकाचे काम वेळेत पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र संबंधित ठेकेदार आणि एसटी महामंडळाच्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काम रखडले आहे. काम कधी पूर्ण होणार याबाबत कोणतीही ठोस माहिती प्रशासन देत नाही.

“भिगवणकरांना फक्त आश्वासने मिळतात, सुविधा मिळत नाहीत. लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून हे काम तातडीने पूर्ण करावे,” अशी मागणी प्रवासी संघटना आणि नागरिकांमधून होत आहे.

जर लवकरच या कामाला गती मिळाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!