पाचव्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देताना दीड वर्षाच्या धनंजयचे अश्रू अनावर अनेकांना केलेला भावुक 

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260918-WA0941

पाचव्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देताना दीड वर्षाच्या धनंजयचे अश्रू अनावर अनेकांना केलेला भावुक 

 

अमळनेर : विक्की जाधव.

पाच दिवस मनोभावे सेवा केलेल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आणि आनंदाच्या वातावरणात क्षणभर भावनांचा बांध फुटला. शहरातील झामी चौक परिसरातील महेश जाधव यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे पाचव्या दिवशी विसर्जन करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीत अवघ्या दीड वर्षांच्या धनंजयने आजीच्या कुशीतून बाप्पाकडे पाहत अश्रूंना वाट करून दिली. बाप्पा आपल्यापासून दूर जाणार, ही भावना जणू त्या चिमुकल्यालाही जाणवत असल्याचे दृश्य उपस्थितांच्या काळजाला भिडले.

IMG-20260919-WA0681

आजीच्या कडेवर असलेला धनंजय बाप्पाला निरोप देण्यास तयारच नव्हता. गणरायाकडे पाहत तो रडत होता आणि त्याला बाप्पापासून दूर करणेही जड जात होते. हा निरागस भाव पाहून मिरवणुकीत उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. पाच दिवस घरात बाप्पाची सेवा, पूजा आणि लाड केल्यानंतर निरोपाची वेळ आली की मोठ्यांनाही भावुक व्हावे लागते; मग या चिमुकल्याच्या मनाला बाप्पाचा विरह कसा सहन होणार, अशीच भावना उपस्थितांमध्ये उमटली.

धनंजयचा बाप्पाला निरोप देतानाचा हा भावनिक क्षण मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गणरायाच्या विसर्जनावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष सुरू असताना एका चिमुकल्याच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू अनेकांच्या मनाला चटका लावून गेले. भक्तीला वयाची मर्यादा नसते, याची जिवंत अनुभूती देणारा धनंजयचा हा निरोपाचा क्षण अमळनेरकरांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!