बारामतीतील ब्रँड हॉटेलमध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याची चर्चा; व्हिडिओनंतरही कारवाई नाही?

अपनी भाषा में पढ़े! Translate

बारामतीतील ब्रँड हॉटेलमध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याची चर्चा; व्हिडिओनंतरही कारवाई नाही?

बारामती (प्रतिनिधी) – बारामती शहरातील एका प्रसिद्ध ब्रँड हॉटेलमध्ये अवैधरित्या वेश्याव्यवसायाचा व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतरही सदर हॉटेलमध्ये हा व्यवसाय खुलेआम सुरूच असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर ब्रँड हॉटेलच्या आडून लॉजमध्ये हा अवैध धंदा चालवला जात आहे. रात्रीच्या सुमारास बाहेरून येणाऱ्या महिलांना रूम दिल्या जातात आणि ठराविक ग्राहकांना प्रवेश दिला जातो, अशी चर्चा परिसरात आहे.

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न
बारामती ही स्व.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे होमटाऊन म्हणून ओळखले जाते. अशा ठिकाणी मध्यवर्ती भागात असलेल्या नामांकित हॉटेलमध्ये असा प्रकार घडत असेल तर पोलीस प्रशासन काय करते, असा सवाल उपस्थित होत आहे.

या प्रकारामुळे बारामतीच्या प्रतिमेला गालबोट लागत असून, शालेय विद्यार्थिनी आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या हॉटेलवर तात्काळ छापा टाकून कारवाई करावी आणि सीसीटीव्ही फुटेज तपासावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित हॉटेलवर PITA कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!