अमळनेर रेल्वे स्थानकावर स्वच्छता जनजागृतीचे पथनाट्य

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260920-WA1158

अमळनेर रेल्वे स्थानकावर स्वच्छता जनजागृतीचे पथनाट्य

 

अमळनेर : विक्की जाधव.

मेरा युवा भारत, जळगाव आणि समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘सेवा पंधरवडा’ निमित्त अमळनेर रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियान व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता हीच सेवा’ या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करून प्रवासी व नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली. पथनाट्यात सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, कचरा कचरापेटीत टाकणे, प्लास्टिकचा वापर टाळणे तसेच रेल्वे स्थानक व परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देण्यात आला. ‘स्वच्छ रेल्वे स्थानक – स्वच्छ अमळनेर’ या घोषणेतून स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे विद्यार्थ्यांनी अधोरेखित केले. पथनाट्यास प्रवासी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमास मेरा युवा भारत, जळगावचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे यांचे मार्गदर्शन लाभले व अमळनेर रेल्वे स्थानकाचे वाणिज्य निरीक्षक रवि पांडे व स्थानक व्यवस्थापक अनिल बी. शिंदे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, प्रा. डॉ. जगदीश सोनवणे, प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे, प्रा. अनिता खेडकर व प्रा. डॉ. अस्मिता सरवैया यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाच्या आयोजनात मेरा युवा भारत, अमळनेरचे तालुका समन्वयक सागर कोळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पथनाट्यात तेजस्विनी, कीर्ती, रत्ना, जान्हवी, भावना, जान्हवी, अनुजा, मयुरी व क्रिस केदार यांनी सहभाग घेतला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!