पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलींची टेबल टेनिसमध्ये जिल्ह्यावर सुवर्णमुद्रा!

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260920-WA0743

पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलींची टेबल टेनिसमध्ये जिल्ह्यावर सुवर्णमुद्रा!

चुरशीच्या सामन्यांत नामांकित संघांना नमवत विभागीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड

अमळनेर : विक्की जाधव.

अनुभूती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथे आयोजित १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाने दमदार आणि दैदिप्यमान कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. जिल्ह्यातील नामांकित शाळांच्या संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक सामना चुरशीचा ठरला. पात्रता फेरीतील तीन ते चार सामने जिंकत पी. बी. ए.च्या मुलींनी आपल्या खेळातील कौशल्य आणि आत्मविश्वासाची छाप पाडली.

उपांत्यपूर्व सामन्यात रुस्तम इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाला नमवत पी. बी. ए.च्या मुलींनी अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात यजमान अनुभूती स्कूलच्या संघावर मात करत त्यांनी जिल्हास्तरीय विजेतेपदावर नाव कोरले. या शानदार विजयामुळे पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाची विभागीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अक्षरा जे. पाटील, विनिता डी. कोळी, हर्षिता जे. वाधवानी, हिताक्षी ए. पाटील आणि ग्रंथी के. पटेल या खेळाडूंनी ही ऐतिहासिक कामगिरी साकारली.

या यशामागे क्रीडा शिक्षक रोहन मुंदडा, महेश माळी आणि विनायक सूर्यवंशी यांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षकेतर कर्मचारी मंगलबाई पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले. विजयी खेळाडूंचे शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, प्रशांत वंजारी, अश्विन चौधरी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंदाने अभिनंदन केले. जिल्हास्तरीय विजयाची ही सुवर्ण कामगिरी आता विभागीय स्पर्धेतही दमदार कामगिरीची नवी आशा निर्माण करणारी ठरली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!