ZRUCC बैठकीत खानदेशच्या रेल्वे प्रश्नांची दमदार मांडणी

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260920-WA1167

ZRUCC बैठकीत खानदेशच्या रेल्वे प्रश्नांची दमदार मांडणी

प्रवाशांच्या समस्या, प्रलंबित मागण्या व रेल्वे सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रतिक जैन यांचा ठाम आवाज

 

अमळनेर : विक्की जाधव.

मुंबई येथे पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत खानदेशातील रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसह रेल्वे सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याच्या मागण्यांची प्रभावी व ठामपणे मांडणी करण्यात आली. झेडआरयुसीसी सदस्य प्रतिक विरचंद जैन यांनी खानदेशातील प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी, रेल्वे सेवांबाबतच्या अपेक्षा तसेच प्रलंबित मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. मुंबई येथे झालेल्या या बैठकीस पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक, वरिष्ठ रेल्वे अधिकारी तसेच झेड.आर.यु.सी.सी. सदस्य उपस्थित होते. या बैठकीच्या माध्यमातून खानदेशातील रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांना रेल्वेच्या वरिष्ठ पातळीवर थेट व्यासपीठ मिळाले. खानदेश हा रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रदेश असून, दररोज मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, शेतकरी तसेच विविध कामानिमित्त प्रवास करणारे प्रवासी रेल्वे सेवेचा वापर करतात. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा, गाड्यांना थांबे, वेळापत्रकातील सुधारणा, प्रलंबित मागण्यांची पूर्तता तसेच स्थानकांवरील मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे या बैठकीत अधोरेखित करण्यात आले. खानदेशातील रेल्वे प्रश्न केवळ स्थानिक पातळीवर न राहता ते रेल्वेच्या वरिष्ठ प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम सातत्याने केले जात आहे, अशी भूमिका प्रतिक जैन यांनी मांडली. प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि प्रभावी रेल्वे सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी उपलब्ध असलेल्या अधिकृत व्यासपीठाचा प्रभावी वापर करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समितीच्या माध्यमातून प्रवाशांच्या समस्या थेट रेल्वे प्रशासनासमोर मांडता येत असल्याने खानदेशातील विविध रेल्वे प्रश्नांना भविष्यात सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा खानदेशातील रेल्वे प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. खानदेशातील प्रवाशांचा आवाज रेल्वेच्या व्यासपीठावर सातत्याने बुलंद करण्याचा प्रयत्न राहील, असा निर्धार श्री. जैन यांनी व्यक्त केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!