भिगवणमध्ये गौरी गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा थाटात संपन्न; रविंद्र कोकणे कुटुंबाचा प्रथम क्रमांक
(निलेश गायकवाड)
भिगवण (प्रतिनिधी) – अखिल जे.के. ग्रुप, भिगवण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार दि. १९/०९/२०२६ रोजी सायं. ६.३० वा. नवी पेठ, वार्ड क्र. १, भिगवण येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. अनुष्काताई भरणे (कार्याध्यक्षा, कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान) होत्या. त्याचबरोबर सन्माननीय उपस्थिती म्हणून प्रमिला माई जाधव (मा.जिल्हा परिषद सदस्य पुणे), सौ. मेधनाताई बंडगर (जिल्हा परिषद सदस्य पुणे), सौ. हेमाताई माडगे (पंचायत समिती सदस्य इंदापूर) उपस्थित होत्या.
या स्पर्धेतील विजेत्यांना आरंभ ट्रेडर्स, भिगवण यांच्या सौजन्याने आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
विजेत्यांची यादी:
१) प्रथम क्रमांक – रविंद्र पोपट कोकणे – ॲक्वा प्युरीफायर
प्रायोजक – शिवकृपा इलेक्ट्रॉनिक्स, प्रोप्रा. बालचंद चव्हाण
२) द्वितीय क्रमांक – कु. कावेरी रविंद्र गुरव – पैठणी साडी
प्रायोजक – महावीर कलेक्शन, प्रोप्रा. चेतन बोरा
३) तृतीय क्रमांक – सुवर्णा विलास भोसले – चांदीची जोडवी
प्रायोजक – वैष्णवी ज्वेलर्स, प्रोप्रा. लवटे सर
४) चतुर्थ क्रमांक – मयूरी अमोल देवकाते – प्रेशर कुकर
प्रायोजक – चौधरी फर्निचर, स्वामीचिंचोली, प्रोप्रा. संजय चौधरी
५) उत्तेजनार्थ – सौ. सोनाली स्वप्नील रसाळ – डिनर सेट
यावेळी महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थिती लावून गौरी गणपती सणाची परंपरा जपल्याबद्दल आयोजकांनी सर्वांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आयोजन अखिल जे.के. ग्रुप, भिगवण यांनी केले होते.