मानाचा गणपती लोकप्रिय हनुमान तरुण मंडळाच्या वतीने ‘अभंग गाथा ते कर्तव्य गाथा: एक संघर्ष यात्रा’ या जीवंत देखाव्याचे उदया उद्घाटन

अपनी भाषा में पढ़े! Translate

१

करमाळा : मानाचा गणपती म्हणून संपूर्ण शहरात नावलौकिक असलेल्या आणि करमाळ्यातील सर्वात जुन्या व पारंपारिक लोकप्रिय हनुमान तरुण मंडळाच्या वतीने एका अत्यंत सामाजिक व ज्वलंत विषयावर आधारित ‘अभंग गाथा ते कर्तव्य गाथा: एक संघर्ष यात्रा’ या जीवंत देखाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आगळ्यावेगळ्या देखाव्याचे उद्घाटन उद्या गुरुवार दि. २४/०९/२०२६ रोजी  सायंकाळी ६:०० वाजता किल्ला वेस येथे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते होणार असून पोलीस निरीक्षक रणजीत माने हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत तसेच  पत्रकार संघ, मैत्रीण ग्रुप, अहिल्यादेवी महिला बचत गट यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष विशाल जगताप यांनी दिली आहे.

हा संपूर्ण देखावा सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या प्रेरणादायी कार्यावर आधारित असून, तो पूर्णपणे मंडळाच्या वतीने स्वलिखित आहे. विशेष म्हणजे, मंडळाचे सदस्य स्वतः हा जीवंत देखावा सादर करणार आहेत. सामाजिक बांधीलकी जपत एका धडाडीच्या अधिकाऱ्याचा संघर्ष आणि कर्तृत्व नागरिकांसमोर उलगडून दाखवणारा हा देखावा पाहण्यासाठी करमाळावासीयांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून, सर्वजण मोठ्या अपेक्षेने याची वाट पाहत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!