मंगरूळमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांची कसरत; वेळेच्या पालनाचा मुद्दा चर्चेत  रात्री 10 ची वेळ, मिरवणूक पावणेबारापर्यंत!

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260922-WA0965

मंगरूळमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांची कसरत; वेळेच्या पालनाचा मुद्दा चर्चेत  रात्री 10 ची वेळ, मिरवणूक पावणेबारापर्यंत!

 

अमळनेर : विक्की जाधव.

तालुक्यातील मंगरूळ येथील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ठरवून दिलेल्या वेळेच्या पालनावरून मंगरूळ येथे पोलीस प्रशासन आणि मिरवणुकीतील नागरिक यांच्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

रात्री १० वाजेपर्यंत मिरवणूक पूर्ण करण्याचे नियोजन असताना ११.४७ वाजेपर्यंत मिरवणूक सुरू असल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना प्रयत्न करावे लागले.

यावेळी काही नागरिकांकडून पोलिसांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली, तर काही ठिकाणी घोषणाबाजी आणि धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली.

IMG-20260922-WA0964

गणेशोत्सव शांततेत आणि नियमानुसार पार पडावा, यासाठी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी विनायकराव कोते-पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मिरवणुकीची वेळ, ध्वनिक्षेपकाचा वापर आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांकडून नागरिकांना सूचना करण्यात आल्या. मात्र, मिरवणुकीतील काही नागरिकांना अधिक वेळ उत्सव साजरा करण्याची इच्छा असल्याने दोन्ही बाजूंमध्ये काही काळ मतभेद निर्माण झाले. अखेर पोलिसांनी संवाद आणि समजावण्याची भूमिका घेतल्यानंतर आरती करण्यात आली आणि मिरवणूक विसर्जनासाठी मार्गस्थ झाली.

IMG-20260922-WA0963

या घटनेनंतर मात्र काही प्रश्न चर्चेत आले आहेत. मिरवणुकीतील वेळेचे नियोजन पोलीस प्रशासना समोरील मोठे आव्हान होते, पोलीस निरीक्षक निकम यांनी परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली असली तरी देखील वेळेचे बंधन पाळले गेले नाही. याचाच परिणाम अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीवर होणार का असाही प्रश्न उपस्थित होतो? तसेच बँड-वाद्यांचा वापर, कर्कश ध्वनी  मॉडिफाइड वाहनांबाबत असलेल्या नियमांची अंमलबजावणी कितपत झाली, याबाबत सुजाण नागरिकांकडून चर्चा होताना दिसते तर दुसरीकडे,

गणेश उत्सवाच्या काळात मोठ्या जमावाचे व्यवस्थापन करताना पोलिसांसमोर कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळल्याचेही दिसून आल्यामुळे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे कौतुक होत आहे.

दरम्यान, आगामी अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगरूळ येथील अनुभव आणि जयनिल फाउंडेशन च्या गणेश विसर्जन मिरवणुकीचा अनुभव प्रशासनासाठी आणि नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. ह्या गणेश मंडळाने देखील साडेबारा पर्यंत बॅंड वाजवला होता. असे असले तरी अमळनेर शहरातील मिरवणुकीत वेळेचे नियोजन आणि कायदा-सुव्यस्था आबाधित ठेवण्याची आवश्यकता आहे. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याची जबाबदारी नागरिकांची आहे, तर नियमांची अंमलबजावणी करताना परिस्थितीनुरूप संवाद आणि संयम राखण्याची भूमिका पोलीस प्रशासनाची असावी असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे आगामी मिरवणुकीत दोन्ही बाजूंनी समन्वय कसा राखला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

                                              पत्रकार, विक्की जाधव.                                            मार्मिक समाचार

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!