कुंभारगावचे माजी सरपंच व भिगवणमधील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक राहुल भोई यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; परिसरात हळहळ

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-09-22 at 5.51.11 PM

कुंभारगावचे माजी सरपंच व भिगवणमधील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक राहुल भोई यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; परिसरात हळहळ

(निलेश गायकवाड)

कुंभारगाव / भिगवण (प्रतिनिधी) – कुंभारगाव, ता. इंदापूर, जि. पुणे येथील रहिवासी, भिगवण येथील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक तथा कुंभारगावचे माजी सरपंच, युवा सामाजिक कार्यकर्ते राहुल भोई यांचे आज पुणे येथे कामानिमित्त गेले असताना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने दुःखद निधन झाले.

राहुल भोई हे अत्यंत मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व होते. सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांनी गावाच्या विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण कामे केली. गावात रस्ते, पाणी, स्वच्छता यांसारख्या अनेक विकास कामांना त्यांनी प्राधान्य दिले होते. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे होते. अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर मोठा जनसंपर्क निर्माण केला होता आणि युवकांमध्ये ते विशेष लोकप्रिय होते.

त्यांच्या घरातही ते सर्वांचे आधारस्तंभ होते. एक यशस्वी हॉटेल व्यावसायिक म्हणून भिगवण परिसरात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता.

राहुल भोई यांच्या अकाली जाण्याने कुंभारगाव, भिगवण आणि इंदापूर तालुक्यात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात परिवारात मोठा आप्तपरिवार आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!