हिंदू खाटीक समाज संघटना आणि सार्वजनिक गणेश मंडळाचा सामाजिक उपक्रम कौतुकास्पद; ‘श्री गणेशा आरोग्याचा 2.0’ शिबिराला शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-09-23 at 12.18.21 PM

हिंदू खाटीक समाज संघटना आणि सार्वजनिक गणेश मंडळाचा सामाजिक उपक्रम कौतुकास्पद; ‘श्री गणेशा आरोग्याचा 2.0’ शिबिराला शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भिगवण (प्रतिनिधी) – गणेशोत्सव म्हणजे केवळ भक्ती नव्हे तर सामाजिक बांधिलकी, हाच संदेश देत हिंदू खाटीक समाज संघटनेच्या वतीने सार्वजनिक गणपती उत्सवामध्ये राबवण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयाने ‘श्री गणेशा आरोग्याचा 2.0 – आरोग्य अभियान २०२६’ अंतर्गत सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर युनिट, भिगवण येथे करण्यात आले होते.

मंडळाच्या येथे झालेल्या या कार्यक्रमात शेकडो नागरिकांनी सहभाग घेत आपली रक्त, लघवी, ई.सी.जी. तपासणी करून घेतली व तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला. गरजू रुग्णांना शिबिरानंतर मोफत शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सणासुदीच्या काळात डीजे आणि वर्गणीपुरताच मर्यादित न राहता, आरोग्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर जनजागृती करत समाजोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल हिंदू खाटीक समाज संघटना व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मंडळाने घालून दिलेला हा आदर्श इतर मंडळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!