पवनपुत्र गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिरात ५६ रक्तदात्यांचे योगदान; सामाजिक बांधिलकीचा जागर

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260924-WA0599

पवनपुत्र गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिरात ५६ रक्तदात्यांचे योगदान; सामाजिक बांधिलकीचा जागर

 

अमळनेर : विक्की जाधव.

गणेशोत्सवाच्या उत्साहाला सामाजिक बांधिलकीची जोड देत भोईवाड्यातील पवनपुत्र गणेश उत्सव मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. उत्सवाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा मंडळाचा हा प्रयत्न परिसरात कौतुकाचा विषय ठरला.

यावेळी डी.वाय.एस.पी. विनायक कोते यांनी रक्तदात्या युवकांचे कौतुक करून त्यांना प्रमाणपत्र देत सन्मान केला. पी.आय. दत्तात्रय निकम यांनी उपस्थित युवकांना रक्तदानाचे महत्त्व आणि त्यातून गरजू रुग्णांना मिळणाऱ्या मदतीविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, अर्बन बँकेचे रणजित शिंदे, अमेय मुंदडा यांची विशेष उपस्थिती होती. मंडळाचे अध्यक्ष सुदाम भोई, स्वप्नील शिंगाणे तसेच रक्तदान चळवळीचे प्रमुख मनोज शिंगाणे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम पार पडला.

रक्तदानासाठी योगेश भोई, सचिन बारी, यश चौधरी, गणेश शिंगाणे, पंकज बाविस्कर, भूषण भोई, प्रवीण शिंगाणे, अजय शिंगाणे, चेतन कोळी, गुरुदास कोळी, कृष्णा चौधरी, सागर भोई, राजेंद्र भोई यांच्यासह अनेक युवकांनी सहभाग नोंदविला. तसेच जितू कोळी, दिनेश भोई, स्वप्नील कोळी, राजमल शिंगाणे, परशुराम कोळी, उमेश महाजन, राहुल भोई, शशिकांत कोळी, विक्की भोई, भीका कोळी, साई भोई, किरण चौधरी आदींचे सहकार्य लाभले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!