June 30, 2025 10:14 am

एस.पी.डी.एम. महाविद्यालयात डॉक्टर रजनी लुंगसे यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ संपन्न..

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर : येथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एस पी डी एम महाविद्यालयातील माजी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर रजनी नकुल लुंगसे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभाचा तसेच स्वयंप्रकाशी तारा या कर्मवीर व्यंकटराव रणधीर यांच्या जीवनावरील डॉ . लुंगसे लिखीत व श्री सुधीर पाटोळे पुणे निर्मित चित्रफीती चे उद्घाटन संस्थेच्या कोषाध्यक्षा मा आशाताई रंधे यांच्या अध्यक्षते खाली व संस्थेचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर तुषार रंधे ,संस्थेचे सचिव माननीय निशांत रंधे, मा . राहूल रंधे , विश्वस्त व कुलसचिव श्री रोहित रंधे, मा सौ . सीमाताई रंधे, मुख्याध्यापिका सौ सारिका ताई रंधे विश्वस्त सौ . हर्षाली रंधे विश्व स्त डॉ चित्ते , श्री लोंढे , श्री . माऊली यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. डॉ. लुंगसे यांच्या सेवापूर्ती निमित्त च्या निरोप समारंभ प्रसंगी माजी प्राचार्य डॉक्टर एस एन पटेल, मा. राहूल रंधे,विभाग प्रमुख व उपप्राचार्य डॉक्टर फुला बागुल, केतकी शेवाळे, कविता अंबाडे, प्रा सौ कविता कुमावत यांनी मनोगत व्यक्त केले .सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉक्टर ए बी देशमुख यांनी केले .प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर व्ही एम पाटील यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर आठवले, डॉक्टर वर्मा, प्राध्यापक वाघ यांच्यासह प्राध्यापक सोलंकी यांनी परिश्रम घेतले. सर्व वक्त्यांनी डॉक्टर रजनी लुंगसे यांच्या कार्याचा गौरव केला . सत्काराला उत्तर देताना डॉक्टर रजनी लुंगसे यांनी संस्थेचे, महाविद्यालयाचे, कर्मवीर अण्णा बाबांचे ऋण व्यक्त केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ बागूल, प्रा पी जी पारधी,एस टी ठाकरे , कार्यालय अधिक्षक श्री संजय निकम यांचे सहकार्य लाभले..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!