मदनवाडीत केबल चोर रंगेहाथ पकडला; भिगवण पोलिसांच्या ताब्यात

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-09-12 at 6.05.01 AM

मदनवाडीत केबल चोर रंगेहाथ पकडला; भिगवण पोलिसांच्या ताब्यात

(निलेश गायकवाड)

मदनवाडी (ता. इंदापूर) – गेल्या काही दिवसांपासून मदनवाडी व परिसरात शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत केबल आणि मोटारी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. या चोरींमुळे शेतकरी हैराण झाले होते.

या पार्श्वभूमीवर मदनवाडी येथील शेतकऱ्यांनी स्वतःच रात्रीच्या वेळी शेतात पाळत ठेवण्यास सुरुवात केली. अखेर शेतकऱ्यांच्या या सतर्कतेचा फायदा झाला.

रात्री २ वाजता रंगेहाथ पकडले

काल मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास एक चोरटा शेतातील केबल चोरी करत असताना शेतकऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले. तात्काळ त्याला ताब्यात घेऊन भिगवण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांची धाडसी कामगिरी

आरोपीला पकडताना पांडुरंग बंडगर, संजय बंडगर, बापू ठवरे, संतोष बंडगर, भाऊसाहेब बंडगर या शेतकऱ्यांनी धाडस दाखवले. त्यांच्या या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे परिसरातील केबल चोरीच्या टोळीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, भिगवण पोलिसांनी या चोरीच्या मुळापर्यंत जाऊन संबंधित टोळीचा छडा लावावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!