महापुरात सर्वस्व गमावलेल्या फोटोग्राफर बांधवाला मिळाली आपुलकीची साथ; ‘हेल्पिंग हँड’ने उचलला मदतीचा हात

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-09-10 at 9.27.08 PM

महापुरात सर्वस्व गमावलेल्या फोटोग्राफर बांधवाला मिळाली आपुलकीची साथ; ‘हेल्पिंग हँड’ने उचलला मदतीचा हात
अमळनेर, ३१ जुलै रोजी शहराला आलेल्या महापुराचा मोठा फटका विविध व्यावसायिकांना बसला. गळवाडे रोडवरील मुंदडा रेसिडेन्सीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील फोटोग्राफर प्रेम पाटील यांच्या स्टुडिओमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. नुकसानीचे फोटो व व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केले. ते पाहून फोटोग्राफर बांधवांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.‘ऑल इंडिया फोटोग्राफर हेल्पिंग हँड फाऊंडेशन’चे महाराष्ट्र सचिव पवन बन्सल यांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रेम पाटील यांच्याशी संपर्क साधून नुकसानीची माहिती घेतली. प्रेम पाटील हे संघटनेचे सदस्य नसतानाही केवळ फोटोग्राफर बांधव असल्याच्या भावनेतून फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे केला. संस्थापक व अध्यक्ष धरम सरोज, उपाध्यक्ष अशोक कोटियन, महाराष्ट्र खजिनदार नितीन पाटील, महाराष्ट्र सचिव पवन बन्सल आणि दिलीप सोनार यांच्या पुढाकारातून प्रेम पाटील यांना ३० हजार रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला.यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष धरम सरोज यांनी फोटोग्राफर बांधवांना मार्गदर्शन केले. स्टुडिओमध्ये महत्त्वाची उपकरणे तसेच ग्राहकांचा डेटा असतो. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या काळात उपकरणे व डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. फोटोग्राफी व्यवसायात स्पर्धेपेक्षा एकमेकांना सहकार्याची भावना अधिक महत्त्वाची आहे. सहकाऱ्याला प्रतिस्पर्धी न मानता मित्र समजून त्याच्या अडचणीच्या काळात मदतीला धावून गेल्यासच व्यवसायाची प्रगती होईल. ‘संकटात मदत हीच खरी एकजूट’ असल्याचेही त्यांनी सांगितले.अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी असोसिएशनच्या माध्यमातून फोटोग्राफर बांधवांसाठी आतापर्यंत करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संघटनेच्या माध्यमातून फोटोग्राफर बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच गरजेच्या वेळी परस्पर सहकार्य करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी संस्थापक अध्यक्ष भगवान पाटील, खजिनदार मनोज चित्ते, अनंत पाटील, नितीन भावसार, गौरव शुक्ल, वरुण पाटील, प्रणव महाजन, राहुल भोई, विपुल पाटील, कुणाल पाटील यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य आणि तालुक्यातील मोठ्या संख्येने फोटोग्राफर बांधव उपस्थित होते.महापुरात नुकसान झालेल्या सहकाऱ्याच्या मदतीला धावून येत फोटोग्राफर बांधवांनी ‘आपत्तीच्या काळात संघटितपणे उभे राहणे’ हाच खरा जागतिक छायाचित्रण दिनाचा संदेश असल्याचे दाखवून दिले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!