श्री मंगळग्रह मंदिरात आज श्री सत्यनारायण महापूजा 

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260831-WA1366

श्री मंगळग्रह मंदिरात आज श्री सत्यनारायण महापूजा 

 

 

अमळनेर : विक्की जाधव.

श्रावणानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात मंगळवार, दि. 1 सप्टेंबर 2026 रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. या महापूजेला सकाळी साडेआठच्या सुमारास या महापूजेची मंत्रच्चारासह विधिवत सुरूवात होईल.

IMG-20260901-WA0605

मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी श्रावण मासानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले जाते. श्रावण मासातील भगवान विष्णूंच्या सत्यनारायण स्वरूपाची महापूजा करणे अतिशय पवित्र व पुण्यफल प्राप्तीचे मानले जाते.

IMG-20260901-WA0650

या काळात वातावरण पूर्णपणे सात्त्विक असते. त्यामुळे या पवित्र महापूजेवेळी शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासह तीर्थप्रसादासाठी सकाळी 9 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत यावे, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!