रुद्र महाभिषेकाने श्री मंगळग्रह मंदिरात भक्तीचा दरवळ!

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260829-WA0707

रुद्र महाभिषेकाने श्री मंगळग्रह मंदिरात भक्तीचा दरवळ!

 

अमळनेर : विक्की जाधव.

श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात आज सोमवार, दि. 31 ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात रुद्र महाभिषेक झाला.

IMG-20260901-WA0605

श्री मंगळग्रह मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव, जयेंद्र वैद्य, तुषार दीक्षित, मंदार कुलकर्णी, अक्षय जोशी, वैभव लोकांक्षी, हेमंत गोसावी, परशुराम शर्मा तसेच उमेश पाठक हे रुद्र महाभिषेक पूजेचे मानकरी होते.

IMG-20260901-WA0650

या सर्वांनी मंदिरातील श्री मंगळेश्वर महादेवांच्या पिंडीवर विधिवत सामूहिक रुद्र महाअभिषेकासह पूजा-अर्चा व बिल्वार्चना केली. भगवान महादेवांच्या उपासनेसाठी विशेष पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावणातील या धार्मिक विधीमुळे मंदिर परिसरात भक्तीमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.

मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी श्रावण मासानिमित्त रुद्र महाभिषेकाचे आयोजन केले जाते. यंदाही पारंपरिक धार्मिक विधींचे पालक करीत रुद्र महाभिषेक झाला. महादेवांच्या पिंडीवर जल, दुग्ध आदींच्या अभिषेकासह मंत्रोच्चार तसेच ‌‘ओम नम: शिवाय‌’ हा सामूहिक जप करण्यात आला. यावेळी भाविकांनी भगवान महादेवांचे दर्शन घेत पूजा-अर्चा केली.

हिंदू धर्मातील धार्मिक परंपरेत श्रावणात भगवान महादेवांची उपासना, रुद्र महाभिषेक, महामृत्युंजय जप आणि शिवस्मरण करण्याला अतिशय महत्त्व आहे. ‌‘रुद्र‌’ हे भगवान महादेवांचे उग्र स्वरूप मानले जाते. रुद्र महाभिषेकाच्या माध्यमातून शिवतत्त्वाचे स्मरण, अंत:करणाची शुद्धी आणि आध्यात्मिक समाधान प्राप्त होते, अशीही भाविकांमध्ये श्रद्धा आहे. रुद्र महाभिषेकानंतर झालेल्या महाआरतीने सोहळ्याची सांगता झाली. याप्रसंगी झालेला घंटानाद, शंखनाद आणि मंत्रोच्चारांनी मंदिर परिसर दुमदुमला. उपस्थित भाविकांनी ‌‘हर हर महादेव‌’चा जयघोष करीत आरतीत सहभाग नोफ्लदविला.

रुद्र महाभिषेकाच्या पौरोहित्यावेळी पुरोहितांनीच ढोलकीवर भगवान महादेवांची स्तुती करणारी गीतेही म्हटली. या धार्मिक सोहळ्यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, विश्वस्त डी. ए. सोनवणे यांच्यासह मंगल सेवेकरी, भाविक व मंदिरातील सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!