मिक्सरमध्ये तयार होत होते ‘भेसळीचे दूध’; जानवे-इंदपिंप्री रस्त्यावर FDAची धडक कारवाई.

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260831-WA0882(1)

मिक्सरमध्ये तयार होत होते ‘भेसळीचे दूध’; जानवे-इंदपिंप्री रस्त्यावर FDAची धडक कारवाई.

 

अमळनेर : विक्की जाधव.

दूध म्हणजे प्रत्येकाच्या घरातील आरोग्याचा आधार; मात्र याच दुधाच्या फॅटमध्ये वाढ करण्यासाठी भेसळीचा धंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार अमळनेर तालुक्यातील जानवे येथे उघडकीस आला आहे. जानवे-इंदपिंप्री रस्त्यावरील एका पत्री शेडमध्ये अन्न व औषध प्रशासन आणि अमळनेर पोलिसांनी संयुक्त छापा टाकत कथित भेसळयुक्त दूध तयार करण्याचा प्रकार उघड केला. कारवाईवेळी महेश दिलीप पाटील (वय २७) हा मिक्सरच्या साहाय्याने मिश्रण तयार करताना आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुमारे १० लिटर भेसळयुक्त मिश्रण १०० लिटर गायीच्या दुधात फॅट वाढवण्यासाठी मिसळले जात होते. तयार केलेले दूध धुळे येथे विक्रीसाठी पाठवले जात असल्याचे आरोपीने सांगितल्याचे समोर आले आहे. छाप्यात मिक्सर, सोयाबीन तेल, लोखंडी कॅन, गायीचे दूध आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आकाश बोराडे, ऋषभ चव्हाण आणि अमळनेर पोलिसांच्या पथकाने दुपारी साडेतीनच्या सुमारास ही कारवाई केली.

या प्रकरणामुळे दुधाच्या फॅटच्या नावाखाली नेमका किती मोठा खेळ सुरू होता? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तयार केलेले भेसळयुक्त दूध किती दिवसांपासून बाजारात जात होते, ते नेमके कुठे-कुठे पोहोचले आणि या प्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन अधिकारी आकाश बोराडे यांच्या फिर्यादीवरून संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. एका पत्री शेडवर पडलेली ही धाड केवळ एका व्यक्तीपर्यंत मर्यादित राहणार की ‘फॅटच्या खेळा’मागचे आणखी चेहरे समोर येणार, याकडे आता अमळनेरकरांचे लक्ष लागले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!