कर्मयोगीने स्वच्छतेचा संदेश देत पेटविली होळी….
कर्मयोगी फाऊंडेशन हे बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर कार्य करणारे सामाजिक संघटन आहे. आपल्या नवनवीन कल्पकतेतून कर्मयोगी मार्फत मोठ्या प्रमाणात समाजभिमुख उपक्रम निरंतर राबविल्या जात आहेत. दि.१७/३/२२ रोज गुरूवारला होळी सणाचे औचित्य साधून वेणा नदी औद्योगिक क्षेत्र बुटीबोरी येथे सकाळी ६ ते ८ या वेळेत श्रमदान राबवून संपूर्ण नदीचा घाट स्वच्छ व सुंदर करण्यात आला. या श्रमदानातून जो ओला व सुका कचरा मोठ्या प्रमाणात निघाला त्याला एका जागी जमा करण्यात आले. यातून जो कचऱ्याचा मोठा ढिग तयार झाला होता अंततः त्याला पेटवून कृतीतून होळी सण साजरा करत सर्वांना स्वच्छतेच्या माध्यमातून होळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

हे श्रमदान यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळीनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली..