भिगवण येथे मंगळागौर कार्यक्रमात स्त्रीशक्तीचा जागर; “खेळ परंपरेचा जागर स्त्रीशक्तीचा” कार्यक्रम उत्साहात संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-08-27 at 1.06.25 PM

भिगवण येथे मंगळागौर कार्यक्रमात स्त्रीशक्तीचा जागर; “खेळ परंपरेचा जागर स्त्रीशक्तीचा” कार्यक्रम उत्साहात संपन्न

(निलेश गायकवाड)

भिगवण (प्रतिनिधी) – श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा आणि बालविकास केंद्र (दिंडोरी प्रणित) भिगवण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला मंगळागौर कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक थाटात पार पडला. “खेळ परंपरेचा जागर स्त्रीशक्तीचा” या बोधवाक्याखाली आयोजित या कार्यक्रमास महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

न भूतो न भविष्यति असा हा मंगळागौर सोहळा संपूर्ण महाराष्ट्रीयन परंपरा जपत साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रीयन वेशभूषा स्पर्धा, उखाणे स्पर्धा, बेडूक उड्या, काठवट खाणे स्पर्धा अशा विविध मनोरंजनात्मक आणि पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. महिला भगिनींनी या सर्व स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आनंदाचा कळस गाठला.

वासुदेव, ऐतिहासिक व सामाजिक व्यक्तिरेखा जसे की म्हाळसा, बानू, सावित्रीबाई फुले, जिजाऊ, महाराष्ट्रीयन परंपरा, राधा अशा विविध वेशभूषा साकारत महिलांनी कार्यक्रमास विशेष रंगत आणली.

या कार्यक्रमास महिलांचा आधारस्तंभ असलेल्या आदरणीय माई यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तर जिल्हा परिषद सदस्या मेघनाताई बंडगर यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाची धुरा सांभाळली. योगशिक्षिका आणि आदर्श व्यक्तिमत्व डॉ. पद्मा खरड मॅडम यांनी या कार्यक्रमात परीक्षक म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य, तसेच संपूर्ण नियोजन कमिटीचे अथक परिश्रम आणि महावितरणच्या विशेष सहकार्याचा मोठा वाटा राहिला.

पारंपरिक खेळांचा विसर पडत असताना अशा कार्यक्रमांमुळे नवी पिढी आणि महिला वर्गात पुन्हा एकदा संस्कृतीचा जागर होत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!