हजरत मो. पैगंबर जयंती दौंड शहरात मोठ्या उत्साहात साजरी.
विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड: सामाजिक सलोखा राखणाऱ्या दौंड शहरात हजरत मो. पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली दरवर्षी प्रमाणे समस्त मुस्लिम समाज व शाही आलमगीर मशीदीच्या वतीने जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. आयोजकांच्या वतीने भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. आलमगीर मशीद येथून जुलुसला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव तसेच लहान मुले वेगवेगळया वेशभुषेत उंट, घोड्यावरून जुलूस मध्ये सहभागी झाले होते.
मुस्लिम बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी शहरातील सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी जुलूस मध्ये सहभागी होऊन मुस्लिम बांधवांना मिठाई, आईस्क्रीमचे वाटप केले. फटाक्यांच्या आतिषबाजीत व पैगंबरांच्या जयघोषात जुलुस शहरातील प्रमुख चौकातून मार्गस्थ होत असताना शहरातील विविध ठिकाणी पक्ष, संघटनांच्या वतीने जुलूस चे स्वागत करण्यात आले,
शाही आलमगीर मशीद येथे जुलुसची सांगता करण्यात आली.