पंचायत समिती सदस्या हेमाताई माडगे यांनी घेतला गणातील अपूर्ण घरकुल मेळावा

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-07-07 at 2.57.43 PM (1)

पंचायत समिती सदस्या हेमाताई माडगे यांनी घेतला गणातील अपूर्ण घरकुल मेळावा

(निलेश गायकवाड)

WhatsApp Image 2026-07-07 at 2.57.43 PM

पंचायत समिती इंदापूर जिल्हा पुणे भिगवन पंचायत समिती गणस्तरीय अपूर्ण घरकुल लाभार्थी मेळावा भिगवन ग्रामपंचायत या ठिकाणी इंदापूर पंचायत समिती सदस्य हेमाताई माडगे यांनी आयोजित केला होता. यासाठी मार्गदर्शक म्हणून विस्तार अधिकारी पंचायत समिती विलास बंडगर यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रम साठी जिल्हा परिषद सदस्या मेघनाताई बंडगर यांची प्रमुख उपस्थित होत्या. पंचायत समिती सदस्या हेमाताई माडगे यांच्या अध्यक्ष च्या खाली हा कार्यक्रम पार पडला. या मेळाव्या साठी विस्तार अधिकारी विलास बंडगर यांनी मार्गदर्शन केले व उपस्थित पदाधिकारी अजिंक्य माडगे, तुकाराम बंडगर, अश्विनी बंडगर, गुराप्पा पवार, सचिन शेठ बोगावात,प्रशांत शेलार, बाप्पूराव थोरात, कपिल भाकरे, सीमाताई काळंगे, सुरेश बिबे,रियाज शेख व सर्व गावचे ग्रामसेवक उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी भिगवन गणातील भिगवन मदनवाडी तक्रारवाडी डिकसळ पोंदोडी कुंभारगाव येथील घरकुल अपूर्ण आहेत ते सर्व नागरिक ग्रामपंचायत या ठिकाणी उपस्थित होते. या अपूर्ण राहिलेले घरकुलाचे काम कसे पूर्ण करता येईल त्यासाठी लागणारी पंचायत समिती कडून मदत ही करणार असल्याचे सदस्य हेमाताई माडगे यांनी बोलताना सांगितली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!