हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते राज्य ग्रा. पं. अधिकारी इंदापूर युनियनच्या नूतन कार्यकारिणीचा सन्मान

अपनी भाषा में पढ़े! Translate

in

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते राज्य ग्रा. पं. अधिकारी इंदापूर युनियनच्या नूतन कार्यकारिणीचा सन्मान

(निलेश गायकवाड)

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य ग्रा. पं. अधिकारी युनियन, जिल्हा शाखा पुणे यांच्या इंदापूर तालुका सन 2026-2031 साठी निवड झालेल्या नूतन कार्यकारिणीचा इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो येथे शुक्रवारी सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करीत ग्रामविकास अधिकारी हे त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रशासनाचा महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे नमूद केले. शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यात त्यांची भूमिका मोलाची असल्याचे सांगितले. ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्यासाठी अधिकारी व गावोगावचे लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी बोलताना केले. तसेच याप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष निलकंठ गिरी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सर्व सहकाऱ्यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार मानतो व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या न्याय्य प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करू. यावेळी ग्रा. पं. अधिकारी युनियनचे पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.
•इंदापूर ग्रा. पं.अधिकारी युनियन नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे:-
निलकंठ दत्तात्रय गिरी- (अध्यक्ष)
स्वप्नील माणिक गायकवाड- (सचिव )
विठ्ठल नामदेव मरगळ- (उपाध्यक्ष)
शैला गंगाराम आटोळे- (महिला उपाध्यक्ष) दादासाहेब बाळकृष्ण वाघ (कार्याध्यक्ष)
महादेव शंकर नगरे (कोषा अध्यक्ष )
रवींद्र आनंता शेलार- (प्रसिद्धीप्रमुख)
अमोल प्रकाश भोसले- सदस्य
शोभा नारायण जाधव- सदस्य
अंबिका अरविंद पावसे- सदस्य
गणेश शिवाजी खरमाटे- सदस्य
राजेंद्र पांडुरंग काळे- सदस्य

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!