अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे नागरिकांना आवाहन

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-07-01 at 10.23.46 AM

अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे नागरिकांना आवाहन

तालुका प्रतिनिधी :-पवन जिवतोडे

भद्रावती : भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी वृद्ध पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून, त्याची ओळख पटविण्यासाठी भद्रावती पोलिसांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास नागपूर महामार्गावरील शेतकरी हॉटेलच्या पाठीमागील शेतशिवारात सुमारे ५२ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

मृत व्यक्तीची उंची अंदाजे ५ फूट ६ इंच असून रंग काळा-सावळा आहे. शरीरयष्टी अत्यंत कृश असून दाढी व पांढरे केस वाढलेले आहेत. अंगात गडद निळ्या रंगाचा चेक्स असलेला पूर्ण बाह्यांचा शर्ट, कमरेला पट्टा आणि पायात स्लिपर असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

सध्या मृतदेह ओळख पटेपर्यंत ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथील शवागारात ठेवण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती आपल्या परिसरातील बेपत्ता असल्याची माहिती असल्यास किंवा मृत व्यक्तीची ओळख पटत असल्यास नागरिकांनी तात्काळ भद्रावती पोलीस ठाण्याशी किंवा तपासी अधिकारी सपोनि. विरेंद्र केदारे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!