शहापूर येथे वीज पडून युवा शेतकऱ्याचा मृत्यू..
अमळनेर : विक्की जाधव.
शहापूर ता. अमळनेर येथील राकेश रतिलाल पाटील (वय -32) या तरुणाचा आज ता. 23 रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शेतात वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
शेतात आईसह मजूर कामाला असल्याने राकेशही शेती कामाला आलेला होता. ता. 23 रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास विजेच्या कडाक्यासह पावसाला सुरुवात झाल्याने राकेश आपली मोटार सायकल (दुचाकी )रस्त्यावर लावण्यासाठी घाईने निघाला असताना त्याच्या अंगावर अचानक वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.बाजूलाच निंबाच्या झाडाखाली मजूरासह राकेश आई व मजुर थांबलेले होते. आईच्या डोळ्यासमोरच ही घटना घडल्याने राकेशच्या आईचा आक्रोश खूपच वेदनादायी होता.
राकेशच्या अंगावर पडलेल्या विजेचा फटका इतका जबरदस्त होता की त्याच्या अंगावरील कपडे तसेच बागायती रुमाल देखील जळल्याच निदर्शनास आले आहे.
दरम्यान राकेशला तात्काळ अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.शहापूर येथे सायंकाळी उशिरा सात वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.राकेशचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला असून त्याच्या पच्यात आई -वडील, पत्नी दोन विवाहीत बहिणी असा परिवार आहे.