मोफत मोतीबिंदू शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ३९ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र; पनवेलकडे रवाना

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260621-WA1064

मोफत मोतीबिंदू शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ३९ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र; पनवेलकडे रवाना

अमळनेर : विक्की जाधव.

मंगळग्रह सेवा संस्था, मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील सोशल फाऊंडेशन, संकल्प सेवा फाऊंडेशन आणि आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजातील गरजू व ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित या शिबिरात एकूण ७३ नागरिकांनी सहभाग घेतला. नेत्रतज्ज्ञांच्या पथकाने नागरिकांची सखोल तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले.

शिबिरादरम्यान डॉ. विजय बामणे, डॉ. गुरुप्रीत सिंग, डॉ. राहुल पाटील, डॉ. भूपेंद्र वाघ, निशा शिंदे आणि प्राची गायकवाड यांनी नेत्र तपासणी केली. तपासणीनंतर ३९ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले. पात्र रुग्णांची कागदपत्रे पूर्ण करून त्यांना मोफत शस्त्रक्रियेसाठी संस्थेच्या वतीने वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. दुपारी साडेचार वाजता हे सर्व रुग्ण श्री मंगळग्रह मंदिरातून पनवेलकडे रवाना झाले.

मंगळग्रह सेवा संस्था दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी अशा मोफत मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करत असून समाजातील दुर्बल घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातही विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम व खजिनदार गिरीश कुलकर्णी यांनी दिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!