श्री मंगळग्रह मंदिरात योग दिन उत्साहात साजर,  विविध योगप्रकारांचा सराव; आरोग्याबाबत जनजागृती

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260621-WA1062

श्री मंगळग्रह मंदिरात योग दिन उत्साहात साजर,  विविध योगप्रकारांचा सराव; आरोग्याबाबत जनजागृती

अमळनेर : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी प्रसन्न वातावरणात पार पडलेल्या या शिबिरात मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त, मंगल सेवेकरी तसेच मंदिराच्या सेवेकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. योग मार्गदर्शक तथा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम व खजिनदार गिरीश कुलकर्णी यांनी विविध योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा आणि श्वसनक्रियांचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

शिबिरादरम्यान ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, अनुलोम-विलोम, कपालभाती आदी योगप्रकारांचा सराव करण्यात आला. यावेळी दिलीप बहिरम यांनी योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी जीवनशैली असल्याचे सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे मानसिक ताणतणाव कमी होऊन शारीरिक तंदुरुस्ती वाढते व एकाग्रता सुधारते, असे त्यांनी नमूद केले.

खजिनदार गिरीश कुलकर्णी यांनी योगाच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत माहिती देताना नियमित योगामुळे रक्ताभिसरण सुधारते, स्नायू व सांधे बळकट होतात तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते, असे सांगितले. उपस्थित मान्यवरांनी योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचे आवाहन करत निरोगी समाज आणि सशक्त राष्ट्र उभारणीसाठी योग महत्त्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!