न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय व साने गुरुजी कन्या हायस्कूल या दोन्ही शाळांचा 35 वा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260620-WA1610

साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय व साने गुरुजी कन्या हायस्कूल या दोन्ही शाळांचा 35 वा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले

 

अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय व साने गुरुजी कन्या हायस्कूल या दोन्ही शाळांचा 35 वा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे व प्रमुख पाहुणे म्हणून गुणवंतराव पाटील उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना संदीप घोरपडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन मोठ्या संधीची अपेक्षा ठेवण्यासाठी कठोर मेहनत करण्याची आवश्यकता आहे. मेहनतीला नेहमी गोड फळे येतात असे सांगितले. आपल्या प्रेरणादायी व्याख्यानाने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी शाळेच्या स्थापनेपासून तर आजपर्यंतचा संपूर्ण लेखाजोखा व चढ-उतार मांडला. आजचे वैभव हे भूतकाळातील परिश्रमाची परिणीती आहे, तसेच शाळेच्या जडणघडणीत मी स्वतः साक्षीदार असल्याचे अभिमानाने सांगितले. ज्येष्ठ शिक्षक डी. वाय. पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आजपर्यंत शाळेत अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले त्यातील बरेच विद्यार्थी अत्यंत सन्मानाच्या पदावर आहेत. त्यातील काही विद्यार्थी सैन्य दलात आहेत, काही विद्यार्थी शास्त्रज्ञ आहेत, डॉक्टर, इंजिनियर , वकील व कार्पोरेट क्षेत्रामध्ये अत्यंत सन्मानाने आपले माजी विद्यार्थी कार्य करीत आहेत. उपस्थित विद्यार्थ्यांनाही त्यांनी अभ्यास करण्याचे भावनिक आवाहन केले. विद्यार्थी मनोगतात मयूर पाटील, तपन पाटील, नेहा पाटील यांनी स्वतःच्या अनुभवावर मनोगत व्यक्त केले. कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी हिमानी पाटील, समॄध्दी मराठे,निशा महाजन व वैदर्भी पवार यांनी सुंदर अशी नाटिका सादर केली. सदर नाटिकेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय व साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अर्थात मुलं आणि मुली मिळून हॅप्पी बर्थडे हे नाव मैदानावर आकृतीने बंदिस्त केले. यातून मुले आणि मुली एकत्रितपणे स्त्री पुरुष समानतेचा मोठा संदेश देत होते. समाजातील विषमलिंगी भेदभाव कमी करण्यासाठी सदरचा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आहे. अशा या प्रेरणादायी संदेशातून सर्व विद्यार्थ्यांनी 35 वा वर्धापन दिनाला भावनिक अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक जे. एस. पाटील तर आभार प्रदर्शन डी. ए. धनगर यांनी केले. विद्यार्थ्यांनी खरा तो एकची धर्म प्रार्थना म्हणून तसेच घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता केली. अशा या उत्साह पूर्ण प्रेरणादायी कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!