बोरी नदीपात्रातील श्री पातळेश्वर महादेव मंदिरात ४१ फुटी भव्य त्रिशूलाची स्थापना; भूमिपूजन उत्साहात संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

बोरी नदीपात्रातील श्री पातळेश्वर महादेव मंदिरात ४१ फुटी भव्य त्रिशूलाची स्थापना; भूमिपूजन उत्साहात संपन्न..

अमळनेर :विक्की जाधव.

बोरी नदीपात्रात वसलेले आणि सुमारे २०० वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेले श्री पातळेश्वर महादेव मंदिर परिसर लवकरच ४१ फुटी भव्य त्रिशूलाने सुशोभित होणार आहे. या महत्त्वाकांक्षी धार्मिक उपक्रमाच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. त्रिशूल स्थापनेची घोषणा होताच भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

IMG-20260620-WA0870

श्री पातळेश्वर महादेव मंदिर हे अमळनेर व परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. मंदिराच्या आध्यात्मिक वैभवात भर घालणारा ४१ फुटी त्रिशूल हा धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले. या उपक्रमामुळे मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच भाविकांना अधिक प्रेरणादायी वातावरण लाभणार आहे.

भूमिपूजन प्रसंगी सुनील देव, केशव पुराणिक, प्रमोद जाधव, भाऊसाहेब मराठे, आबा सुतार, बापू गुरव, सुभाष मामा, संदीप भोई, योगेश भोई, योगेश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी महादेवाच्या जयघोषात या धार्मिक कार्यास शुभेच्छा दिल्या. लवकरच त्रिशूलाचे काम पूर्ण होऊन भाविकांना या भव्य दिव्य स्थापत्याचे दर्शन घेता येणार असल्याने परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!