डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न पुरस्कारप्राप्त एकनाथराव बोरसे गुरुजींचा परीट महिला भगिनी मंडळाकडून सत्कार”

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260619-WA0011

शिरपूर : समाजसेवा, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आणि सामाजिक बांधिलकी यासाठी आयुष्यभर कार्यरत असलेले ज्येष्ठ समाजसेवक एकनाथराव बोरसे गुरुजी यांना नुकताच पनवेल येथे प्रदान करण्यात आलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न पुरस्काराबद्दल परीट महिला भगिनी मंडळाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी समाजातील विविध मान्यवर, महिला कार्यकर्त्या आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्कार समारंभात बोलताना मंडळाच्या मा.प्रदेशाध्यक्ष सीमाताई रंधे यांनी बोरसे गुरुजींच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “वयाच्या ७५ वर्षांनंतरही एकनाथराव बोरसे गुरुजी समाजकार्याचा अखंड वसा जपत आहेत. आजच्या काळात अनेकजण निवृत्तीनंतर सार्वजनिक जीवनापासून दूर राहतात, मात्र बोरसे गुरुजी समाजहित, शैक्षणिक प्रबोधन, सामाजिक एकोपा आणि युवकांच्या मार्गदर्शनासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांचे जीवनकार्य युवकांसाठी प्रेरणादायी असून समाजसेवेचे उत्तम उदाहरण आहे.”

एकनाथराव बोरसे गुरुजी यांनी शिक्षक म्हणून कार्यरत असताना अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा दिली. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातही त्यांनी विविध उपक्रम राबवून समाजप्रबोधनाचे कार्य केले. समाजातील वंचित, गरजू आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठविला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्तरावर त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

सत्कार प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बोरसे गुरुजींच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. समाजहितासाठी त्यांचे कार्य असेच अविरत सुरू राहावे आणि त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.कार्यक्रमाच्या शेवटी बोरसे गुरुजी यांनी सत्काराबद्दल परीट महिला भगिनी मंडळाचे आभार मानले. समाजाच्या प्रगतीसाठी आणि युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहणार असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या सत्कार सोहळ्यामुळे समाजातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक आदर्श परंपरा निर्माण झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सिमाताई रंधे यांच्यासह सुरेखाताई बेडीसकर, दिपाली सूर्यवंशी, शीतल सैंदाणे, पूजा लुंगसे, मनीषा हरळे, मनीषा भिलाणे, आरती येशी तसेच सौ. बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!