भिगवण गुटखा माफियांनो सावधान…! आता जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना थेट ‘मोक्का’चा फटका बसणार!

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-06-13 at 11.20.27 AM

भिगवण गुटखा माफियांनो सावधान…! आता जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना थेट ‘मोक्का’चा फटका बसणार!

(निलेश गायकवाड)

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अत्यंत महत्त्वाची आणि धाडसी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात बंदी असतानाही गुटखा विक्री करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार असून, गुटखा विकणारे दुकानदार, घाऊक विक्रेते (होलसेलर) तसेच त्याची निर्मिती करणाऱ्या संबंधित घटकांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गुटखा हे केवळ व्यसन नाही, तर तो मृत्यूचे निमंत्रण आहे. तोंडाचा कर्करोग, घशाचे गंभीर आजार, दात व हिरड्यांचे विकार आणि अनेक जीवघेणे आजार या विषारी पदार्थामुळे होत आहेत. कित्येक कुटुंबांनी आपल्या प्रिय व्यक्तींना या व्यसनामुळे गमावले आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांनी या विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तात्काळ हे आदेश पारित केले आहेत

महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही भिगवण मध्ये काही लोक फक्त पैशाच्या हव्यासापोटी समाजाच्या आरोग्याशी खेळत आहेत. अशा लोकांविरोधात कठोर भूमिका घेण्याची वेळ आता आली त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ती घेतलेल्या निर्णयाला भिगवण देखील कसा साथ देतात किव्हा मोका अंतर्गत कारवाईला सामोरे जातील हे बघावे लागेल .

कायद्याचा धाक निर्माण झाला तरच गुटखा माफियांचे जाळे उद्ध्वस्त होईल आणि हजारो तरुणांचे आयुष्य वाचेल.

हा निर्णय केवळ प्रशासकीय नाही, तर भावी पिढीला वाचवण्याचा एक निर्धार आहे.
“व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी कठोर निर्णय आवश्यक आहेत!”

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!