प्रामाणिकपणा समोर सोन्याची चकाकीही फिकी! 20 तोळे दागिने परत केल्याने भिगवण पोलिसांनी केला सत्कार

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रामाणिकपणा समोर सोन्याची चकाकीही फिकी! 20 तोळे दागिने परत केल्याने भिगवण पोलिसांनी केला सत्कार

(निलेश गायकवाड)

सध्या सोन्याचा भाव गगनाला भीडला आहे. वाढत्या दरांमुळे सध्याच्या काळात सोनं सर्वांसाठीच महत्वाचं आहे. सोन्याचे दागिने घालून अनेक जण मिरवतात. अनेकदा दागिने चोरीला जातात, तर काहीवेळा आपल्याच चुकीने आपण विसरून जातो आणि दागिने हरवाता. दागिने हरवलव्यावर प्रामाणिकपणे ते परत करण्यासाठी फार मोठं मन लागतं.

अशा पद्धतीने दागिने किंवा पैसे सापडले तर हे देवाने आपल्यालाच दिलेत असा समज करून व्यक्ती ते स्वत: जवळच ठेवतात. मात्र पैशांचा मोह न करता आजूही माणुसकी शिल्लक आहे. याची प्रचिती भिगवण पोलीस स्टेशनं च्या हद्दीतील महिलेने पिंपळे येथून घडवून आणलीये.

सविस्तर माहिती अशी..

लता सुनील वाबळे (रा. पिंपळे फाटा, ता. इंदापुर) असे या प्रामाणिक महिलेचे नाव आहे. भर रस्त्यात सापडलेली २० तोळे वजनाची सापडलेली बॅग तिने परत मूळ मालकाला स्वाधीन केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले (ता. इंदापुर) येथील एक कुटुंब बुधवारी (दि. १३) पिंपळे येथील पद्मावती मंदिरात देवीच्या देवदर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन परत घरी आल्यानंतर त्यांना धक्का बसला, कारण त्यांच्याकडे सोबत असलेले २० तोळे सोने असलेली बॅगच त्यांना आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी विना विलंब आल्या रस्त्याने बॅगची शोधाशोध सुरू केली. अगदी ज्या पिंपळाच्या देवीच्या दर्शनासाठी आले तिथपर्यंत शोध घेतला पण पदरी निराशा आली.

याच दरम्यान लता वाबळे यांना पद्मावती मंदिराजवळ नागरिक जमल्याची व कोणाची तरी सोने असलेली बॅग हरवल्याची चर्चा कानावर पडली. लता यांनी कसलीही उसंत न घेता नागरिक जमलेल्या ठिकाणी धाव घेतली आणि सकाळी ११ वाजता आपल्याला सोने असलेली बॅग सापडल्याची माहिती प्रामाणिकपणे दिली. हे शब्द ऐकताच आत्तापर्यंत धास्तावलेल्या त्या कुटुंबाच्या जीवात जीव आला. त्यानंतर उपस्थित नागरिकांच्या साक्षीने हरवलेले लाख मोलाचे सोने लता यांनी संबधित कुटुंबाच्या स्वाधीन केले.

या प्रामाणिक घटनेचे कौतुक उपस्थित असलेल्या नागरिकांनी केले. शिवाय ही बाब भिगवण पोलिसांच्या कानावर आली आणि लता व सुनील या दाम्पत्याच्या प्रामाणिकपणाची दखल घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे, पोलिस उपनिरिक्षक अमित पाटील तसेच निश्चल शितोळे, विठ्ठल वारगड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संतोष वाबळे आदी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!