करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त करमाळा शहरातील महसूल मंडळ अधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. १ मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांनी उपस्थित राहून तिरंग्याला मानवंदना दिली.
याप्रसंगी मंडळ अधिकारी राजकुमार पांडेकर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्राममहसूल अधिकारी विनोद जवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ध्वजारोहण झाल्यानंतर उपस्थित सर्वांनी सामूहिकपणे राष्ट्रगीत आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत गायन केले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी उपस्थितांमध्ये देशभक्तीचे आणि राज्याभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले.
या सोहळ्यासाठी नागेश कांबळे, समीर बागवान, दत्तात्रय गायकवाड, जहांगीर शेख, सागर गायकवाड, चेतन ढाळे, करण काळे, संदीप ननवरे आणि सिद्धू काळे यांसह महसूल विभागाचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकमेकांना पेढे वाटून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.