दिग्गज कीर्तनकर, थोर पुरुषांची विचारांची देवाणघेवाण, गावचा येकोपा; विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव साजरा

अपनी भाषा में पढ़े! Translate

दिग्गज कीर्तनकर, थोर पुरुषांची विचारांची देवाणघेवाण, गावचा येकोपा; विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव साजरा

(निलेश गायकवाड)

आदर संविधानाचा, जागर कीर्तनाचा या उक्तीप्रमाणे मदनवाडी गावाची विचारांची आणि संस्कृतीची देवाण-घेवाण विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव 2026 मोठ्या उत्साहात मदनवाडी चौक या ठिकाणी साजरा होत आहे.

या या कार्यक्रमासाठी दिग्गज कीर्तनकार, तसेच व्याख्यान तब्बल हा सोहळा पाच दिवसासाठी आयोजित करण्यात आला आहे . या सोहळ्यासाठी कीर्तनकार आपल्या महापुरुषांच्या तसेच संस्कृतीची जाणीव करून पुढे घडणाऱ्या पिढ्यांसाठी मार्गदर्शन सोहळा ठरत आहे. या सोहळ्यासाठी गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत. जयंती उत्सव साजरा होत आहे. हा सोहळा 26 एप्रिल 2026 पासून ते 30 एप्रिल 2026 पर्यंत सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी मदनवाडी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत दरवर्षी या सोहळ्याचे आयोजन होत असल्याने नागरिकांमध्ये देखील समाधान व्यक्त केले जात आहे.

या सोहळ्याचे आयोजन ज्यांनी केले ते शरद चितारे तसेच दादासो थोरात यांनी सदर सोहळ्याचे आयोजन करत गावामध्ये जयंती उत्सव महापुरुषांच्या विचारांची देवाण-घेवाण तसेच गावच्या एकोप्यामध्ये कीर्तनातून आदर संविधानाचा जागर कीर्तनाचा या पंचशील सोहळ्याचा या उक्तीप्रमाणे वाटचाल होताना दिसत आहे .

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!