चीज अॅनालॉग वापराबाबत ग्राहकांना स्पष्ट माहिती देणे बंधनकारक

अपनी भाषा में पढ़े! Translate

चीज अॅनालॉग वापराबाबत ग्राहकांना स्पष्ट माहिती देणे बंधनकारक

पुणे/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील सर्व रेस्टॉरंट, हॉटेल्स, केटरर्स तसेच फास्ट फूड विक्रेत्यांना अन्नपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या “चीज अॅनालॉग” बाबत ग्राहकांना स्पष्ट व पारदर्शक माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नुसार ग्राहकांना अन्नातील घटकांची अचूक माहिती मिळणे आवश्यक आहे. पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केले जाते, तर चीज अॅनालॉग हे खाद्यतेल, स्टार्च व इतर घटकांपासून बनविले जाते. त्यामुळे दोन्हींच्या पोषणमूल्यांमध्ये व स्वरूपात फरक असतो.

प्रशासनाच्या निर्देशानुसार, चीज अॅनालॉग वापरून तयार केलेल्या पदार्थांचा स्पष्ट उल्लेख बिलावर करणे बंधनकारक आहे. तसेच मेन्यू कार्ड आणि इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवरही याबाबत माहिती देणे आवश्यक राहील. उत्पादक व पुरवठादारांनी विक्री बिलावर “डेअरी/चीज अॅनालॉग” असा स्पष्ट उल्लेख करणेही आवश्यक करण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की चीज अॅनालॉग आरोग्यास अपायकारक नाही, मात्र त्यातील घटक व पोषणमूल्ये पनीरपेक्षा भिन्न असतात. त्यामुळे ग्राहकांनी पॅकबंद उत्पादनांवरील लेबल तपासावे, सुटे पनीर खरेदी करताना खात्री करून बिल घ्यावे आणि हॉटेलमध्ये पनीर व चीज अॅनालॉग यांचा स्वतंत्र उल्लेख आहे का, याची पडताळणी करावी.

या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, पुरवठादार आणि खाद्य व्यवसायिकांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

ग्राहकांची दिशाभूल झाल्यास त्यांनी तक्रार नोंदविण्यासाठी प्रशासनाच्या 1800-222-365 या टोल-फ्री क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन सह आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, पुणे यांनी केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!