शिरपूर भाजपा कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड व मणिपूरवर भाजपाची सत्ता
शिरपूर : भारतीय जनता पार्टीला नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकित चार राज्यात घवघवीत यश मिळाल्याबद्दल शिरपूर शहरात विजयी जल्लोष करण्यात आला. शिरपूर शहरातील भाजपा कार्यालयात सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जगातील सर्वात मोठा ठरलेला भारतीय जनता पक्ष हा विजयी मुसंडी मारत असून लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कामाचा व विश्वासाचा करिश्मा जनतेने मतरुपी आशीर्वाद देऊन दाखवून दिला आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. यात 4 राज्यात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने भारतीय जनता पार्टी शिरपूर तर्फे भाजपा नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत भव्य विजय जल्लोष करीत साजरा केला. माजीमंत्री आ. अमरीशभाई पटेल, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, आ. काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या विजयी जल्लोष कार्यक्रमात धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. भारतीय जनता पार्टीला उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर येथे मिळालेल्या यशाने देशभर आनंदोत्सव साजरा होत असून शिरपूरमध्ये भाजपा कार्यालय ते विजय स्तंभपर्यंत या बाजारपेठेत मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. या प्रसंगी व्यापारी आघाडी माजी जिल्हाध्यक्ष एन. डी. पाटील, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, जि. प. सदस्य प्रा. संजय पाटील, नगर सेवक भुरा राजपुत, माजी जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, तालुका सरचिटणीस जितेंद्र सुर्यवंशी, तालुका चिटणीस सुनिल चौधरी, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, रोहित शेटे, माजी नगर सेवक सोनु सोनार, शहर उपाध्यक्ष मुकेश पाटील, पं स. सदस्य यतिश सोनवणे, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, मुबीन शेख, रफीक तेली, सतीष गुजर, रविंद्र भोई, भटू माळी वरवाडे, राधेश्याम भोई, सुभाष राजपुत, प्रमोद भोंगे, बापु पाटील, संतोष माळी, जितेंद्र पाटील, महेंद्र पाटील हिंगोणी, अजिंक्य शिरसाठ, जगन पाटील, रविंद्र सोनार, पंकज कोळी, गोकुळ कोळी, रोहित सावळे, निलेश पवार, मनजीत पावरा, श्रीकृष्ण शर्मा आदि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी ढोल तश्याच्या गजरात थिरकत ‘मोदीजी आगे बढो, योगीजी आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारत माता की जय, वंदे मातरम चा जयघोष करीत आनंद व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत लाडू-पेढे देखील वाटप करण्यात आले.