आज पासून तीन दिवस महाभूमी सेवा बंद नागरिकांनी कामे नियोजनपूर्वक पूर्ण करावीत!
मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव.
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाकडून महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली असून, 2 एप्रिल ते 5 एप्रिल 2026 या कालावधीत महाभूमी पोर्टलवरील सर्व ऑनलाइन सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत.

तांत्रिक देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे 7/12 उतारा, प्रॉपर्टी कार्ड, फेरफार (डिजिटल साईन व View Only) तसेच नोंदणी व मुद्रांक विभागाशी संबंधित सेवा उपलब्ध राहणार नाहीत. यामुळे नागरिकांना या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन सेवांचा लाभ घेता येणार नाही.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपली महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 6 एप्रिलपासून सर्व सेवा पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या सेवा बंद राहिल्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, नागरिकांनी सहकार्य करावे असेही नमूद करण्यात आले आहे.