अमळनेरकरांच्या जीवाशी खेळ! अमळनेर नगरपरिषदेत एकही प्रशिक्षित फायरमन नाही  प्रशासनाचा धक्कादायक खुलासा..

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरकरांच्या जीवाशी खेळ! अमळनेर नगरपरिषदेत एकही प्रशिक्षित फायरमन नाही  प्रशासनाचा धक्कादायक खुलासा..

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहरातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत अत्यंत गंभीर आणि धक्कादायक बाब समोर आली असून अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागात एकही फायरमन कार्यरत नसल्याचा अधिकृत खुलासा समोर आला आहे. अनेक लेखी तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाने दिलेल्या उत्तरातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे लाखो नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


शासनाच्या आदेशानुसार नगरपरिषदेत अग्निशमन विभागासाठी प्रशिक्षित फायरमन असणे बंधनकारक असताना अमळनेर नगरपरिषदेत ही पदे वर्षानुवर्षे रिक्त असल्याचे समोर आले आहे.

इतकेच नव्हे तर अग्निशमन सेवेसाठी आवश्यक प्रशिक्षण घेतलेला एकही कर्मचारी सध्या कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आग लागल्यास तात्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणाच नसल्याचे चित्र असून हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे.
नगरपरिषद प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे. शहर वाढत असताना, इमारती वाढत असताना आणि लोकसंख्या वाढत असताना अग्निशमनसारखी अत्यावश्यक सेवा सक्षम नसणे ही प्रशासनाच्या निष्क्रियतेची परिसीमा असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. या प्रकरणामुळे मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर अमळनेरकर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून “आग लागल्यावर काय करायचे?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. रिक्त फायरमन पदे तात्काळ भरणे, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आणि अग्निशमन विभाग सक्षम करणे या मागण्या आता जोर धरू लागल्या आहेत. तात्काळ उपाययोजना न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!