अमळनेर लुल्ला मार्केट परिसरात नगरसेवकाला मारहाण; अदखलपात्र गुन्हा दाखल

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर लुल्ला मार्केट परिसरात नगरसेवकाला मारहाण; अदखलपात्र गुन्हा दाखल

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहरातील एका नगरसेवकाला किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात काही काळ चर्चा रंगली होती. किरकोळ वादातून थेट मारहाणीपर्यंत प्रकार गेल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील नगरसेवक भरत ललवाणी यांना शनिवारी रात्री “माझा भाऊ कुठे होता?” असा प्रश्न विचारण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला, मात्र काही क्षणातच हा वाद चिघळला आणि त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. ही घटना शहरातील लुल्ला मार्केट परिसरात घडल्याचे समजते. या घटनेत नगरसेवक ललवाणी यांना धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आल्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी मनोज ठाकरे यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!