अमळनेर तालुका युवासेना नूतन कार्यकारणी जाहीर

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर तालुका युवासेना नूतन कार्यकारणी जाहीर

 

अमळनेर :  विक्की जाधव.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेची अमळनेर तालुक्याची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा यांनी जाहीर केलेल्या कार्यकारणीत तालुका प्रमुखपदी राहुल भास्कर कंजर, विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी पंकज संतोष शेटे, शहर प्रमुखपदी प्रविण पुरुषोत्तम पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तसेच उपशहरप्रमुखपदी करण सुपडू चव्हाण, शेख अल्ताप राजा फारुख, तुषार महेंद्र सोनार, शहर संघटकपदी राकेश रविंद्र लांडगे, उपशहर संघटकपदी यश मोहन साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय कॉलेज कक्ष प्रमुखपदी शंतनु शामकांत भावसार, कॉलेज कक्ष सचिवपदी गौरव रविंद्र पाटील, सोशल मीडिया प्रमुखपदी खेमचंद सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार शिरीषदादा चौधरी, आ. किशोर आप्पा पाटील, आ. अमोल दादा पाटील, आ. चंद्रकांत अण्णा सोनवणे, आ. चंद्रकांत भाऊ पाटील, मा. खा. उन्मेश दादा पाटील आदी मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या निवडीमुळे युवासेनेच्या माध्यमातून नव्या तरुण कार्यकर्त्यांची फळी तयार होऊन संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास शिवसेना तालुका प्रमुख गुलाब पाटील यांनी व्यक्त केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!