छा गये बाबू… अच्छे दिन आ गये… म्हणत अमळनेरच्या तरुणाचा व्हिडीओ देशभर व्हायरल.

अपनी भाषा में पढ़े! Translate

छा गये बाबू… अच्छे दिन आ गये..” म्हणत अमळनेरच्या तरुणाचा व्हिडीओ देशभर व्हायरल.

 

अमळनेर : विक्की जाधव.

एका व्हिडीओने बदलली ओळख; अमळनेरचा तरुण देशभरात व्हायरल.

सोशल मीडियाच्या युगात कोण कधी प्रसिद्ध होईल सांगता येत नाही, याचे जिवंत उदाहरण म्हणजे अमळनेर येथील तरुण अनंत रमेश निकम. पेट्रोल पंपावर झालेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी “अच्छे दिन आ गये…” असे म्हणत तयार केलेला छोटासा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अनेक सेलिब्रिटी, रिल स्टार आणि सोशल तसेच राजकीय पुढाऱ्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे अमळनेरचा हा तरुण अचानक चर्चेत आला आहे.

जगभरात सुरू असलेल्या इराण –युनाइटेड स्टेट युद्धाचा चा परिणाम अप्रत्यक्षपणे इंधन दरांवर होत असून भारतात पेट्रोल-डिझेल संदर्भात सोशल मीडियावर अनेक मीम्स आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अमळनेर येथील पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाली होती.

परिस्थिती जणू लॉकडाऊनसारखी दिसत असताना अनंत निकम यांनी व्हिडीओ तयार केला आणि तोच व्हिडीओ लोकांच्या पसंतीस उतरला.

या व्हिडीओची लोकप्रियता इतकी वाढली की सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर Dhruv Rathee यांनी देखील हा व्हिडीओ एक्स, युट्युब आणि इन्स्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला. तसेच Indian National Congress च्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरूनही हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आल्याने अनंत निकम अधिकच चर्चेत आले.

एका साध्या व्हिडीओमुळे अमळनेरचा तरुण देशभरात पोहोचला असून सोशल मीडियाची ताकद पुन्हा एकदा दिसून आली आहे. त्यामुळे सध्या अमळनेर शहरात एकच चर्चा सुरू आहे “अमळनेरचा अनंत निकम छा गये बाबू!”

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!