जिनियस मॅथेमॅटिक्स परीक्षा परीक्षेत पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी
अमळनेर : विक्की जाधव.
नमो शैक्षणिक फाउंडेशन संस्था संचलित गणित विषयावर आधारित जिनियस मॅथेमॅटिक्स परीक्षेचे आयोजन हे पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आयोजीत करण्यात आले होते. गणितीय स्वरूपात तसेच सूत्र व अंकीय गणित अशा नानाविविध प्रारूपामध्ये उपरोक्त परीक्षेचे संयोजन आराखडा तयार केलेला असतो.

बौद्धिक क्षमतेचा तीव्र स्वरूपात चातुर्य पारखणारी अशा स्वरूपात विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभावान चुणूक दाखवून उपरोक्त स्पर्धेचे पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग स्वरूपात यश संपादित करून आकाशाला गवसणी घालावे अशा रीतीने यश संपादन केले.

सदर स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर नैपुण्य प्राप्त केलेले विद्यार्थी जिल्हास्तर १) विवान महेश लोढा (इयत्ता तिसरी) यामध्ये रोख रक्कम स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र. विद्यालयीन स्तरावरील उत्तीर्ण विद्यार्थी देशना वर्धमान जैन (इयत्ता तिसरी) स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र हम्माद मोहसीन खानपठाण(इयत्ता चौथी) स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र सदर विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन सहकार्य सर्वोतोपरी मदत शाळेचे चेअरमन डॉ. श्री संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, विद्या कुलकर्णी, योगिता पाटील, स्वाती माळी, व्ही.जी. बोरोले, प्रशांत वंजारी समस्त शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदवर्ग यांचे लाभले.