गडावरपायी जाणाऱ्या भाविकांची तहान भागवणारी सेवाधार येथील तरुणांची दहा वर्षांची परंपरा कायम

अपनी भाषा में पढ़े! Translate

गडावरपायी जाणाऱ्या भाविकांची तहान भागवणारी सेवाधार येथील तरुणांची दहा वर्षांची परंपरा कायम

अमळनेर : विक्की जाधव 

धार ता. अंमळनेर येथील तरुणांनी सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी थंड पाणी व थंडगार मठ्ठ्याचा भंडारा आयोजित करून सेवाभावाची सुंदर परंपरा जपली आहे.चोपडाई कोंढावळ गावाजवळ आयोजित या उपक्रमाला यंदा तब्बल दहा वर्षे पूर्ण झाली असून, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारो भाविकांनी या भंडाऱ्याचा लाभ घेतला. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची तहान भागवण्यासाठी तरुणांनी दिवसभर सेवा देत भाविकांचे स्वागत केले.

या वेळी श्री राहुल गोसावी, श्री सतीश पाटील, श्री राहुल पाटील, श्री पप्पू पाटील, श्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला. तसेच श्री योगेश पाटील, श्री किशोर पाटील, भैया महाराज, शेफिक मुजावर, जमाल मुजावर, दिवेश पाटील, कोंढावळ येथील श्री गोपाल पाटील तसेच ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सेवाभावी उपक्रमाबद्दल भाविकांनी तरुणांचे कौतुक करत आभार व्यक्त केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!