अमलेश्वर नगर गोळीबार प्रकरण; मित्रानेच केला कट्ट्यानें मित्राचा घात आरोपी भूषण महाजन अटकेत;

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमलेश्वर नगर गोळीबार प्रकरण; मित्रानेच केला कट्ट्यानें मित्राचा घात आरोपी भूषण महाजन अटकेत;

 

अमळनेर : मार्मिक न्यूज नेटवर्क.

अमलेश्वर नगर परिसरात काल रात्रीं झालेल्या गोळीबार प्रकरणाने शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणात मयताच्या मित्रावरच खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण सुरेश महाजन याचा त्याचा घरात गावठी कट्टा साफ करताना यांच्या घरात गोळी लागून मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत संशयित आरोपी भूषण महाजन याला भल्या पहाटे अटक केली.

घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह पोलीस पथक व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. संशयित भूषण महाजन यांच्या घराची झडती घेऊन काही नमुने जप्त करण्यात आले. दरम्यान, मयत अरुण याचा भाऊ नरेंद्र महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अरुण हा रात्री दवाखान्यातून परत येत असता ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत. दरम्यान, वापरण्यात आलेला कट्टा कोठून आणला व शहरात अजून किती अवैध शस्त्रे आहेत याचा पोलीस सखोल तपास करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!