करमाळा शहराजवळ फिंरगाईनगर येथे घरफोडी; ७० हजारांचा ऐवज लंपास

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- करमाळा तालुक्यातील फिरंगाईनगर (दुधाट फ्लोटिंग परिसर) येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तुषार अमोल जाधव (वय २१, रा. सिंध्दार्थनगर, करमाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांचे फिरगाईनगर येथे एक रो हाऊस असून तेथे अधूनमधून कुटुंबीय राहण्यासाठी जातात. या घरात जुनी पितळेची भांडी तसेच साखरपुड्यासाठी खरेदी केलेले कपडे ठेवण्यात आले होते.
दि. २४ मार्च रोजी दुपारी सुमारास तक्रारदारांचे नातेवाईक वैभव शेलार हे संबंधित घराकडे गेले असता घराच्या पुढील दरवाज्याचा कडी-कोयंडा तुटलेला आढळला. त्यांनी याबाबत तक्रारदारांना माहिती दिली. तक्रारदार घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. शेजाऱ्यांकडून चौकशी केली असता मागील दोन दिवसांपासून घराचा मागील दरवाजा उघडा असल्याचे समोर आले.
या घरफोडीत सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे कपडे (साड्या, शर्ट पीस, पॅंट पीस), १५ हजार रुपये किमतीची पितळेची भांडी (पाण्याचा बंब, डिनर सेट, घागर, कळशी आदी) तसेच १० हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही असा एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.
ही चोरी दि. २१ मार्च रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते दि. २४ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून ही घरफोडी केली आहे.
या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. परिसरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!